ऑनलाईन टीम / बेंगळूर :
‘लष्कर-ए-तोयबा’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या भरती प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) एकाला अटक केली आहे.
सय्यद एम. इद्रीस (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कर्नाटकातील उत्तर कन्नड येथील रहिवासी आहे.
भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेची भरती करण्यासाठी पाकिस्तानातून धावणाऱ्या विविध सोशल मीडिया गटांचा तो एक भाग होता. NIA मागील काही दिवसांपासून त्याच्या मागावर होती. अखेर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.