पाकिस्तानकडून दहशतवाद्याची पाठराखण
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाच्या पाच दहशतवाद्यांची बँक खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांमध्ये मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईदही सामील आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीकडून मंजुरी मिळाल्यावर ही खाती सुरू करण्यात आल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात आला आहे.
हाफिजसह लष्कर-ए-तोयबा आणि जमातचा दहशतवादी अब्दुल सलम भुट्टवी, हाजी एम. अशरफ, याह्या मुजाहिद तसेच जफर इक्बालचे खाते सुरू झाले आहे. या सर्वांना संयुक्त राष्ट्रसंघानेच दहशतवादी घोषित केले आहे.
कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे सांगत हाफिज सईदची मे महिन्यात लाहोर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती. तर उर्वरित 4 दहशतवादी अद्याप तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
कुटुंबाचा खर्च करत यावा यासाठी बँक खाते सुरू करण्यात यावे अशी मागणी या दहशतवाद्यांनी सुरक्षा परिषदेसमोर केली होती. या सर्व दहशतवाद्यांनी पाकिस्तानला सरकारला स्वतःच्या उत्पन्नाचा कथित स्रोत सांगितल्यावर त्याचा तपशील सुरक्षा परिषदेकडे पाठविण्यात आला होता.