श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ात सोमवारी सुरक्षा दलांनी एका आयईडीचा शोध लावून तो नष्ट केल्याने घातपाताचा कट उधळला गेला आहे. सुरक्षा दलांच्या एका संयुक्त पथकाला अवंतिपुरा येथील पंजगाममध्ये एका रस्त्याच्या कडेला आयईडीचा शोध लागला होता. बॉम्बविरोधी पथकाने आयईडी नष्ट केला आहे. यात सुमारे 10 किलो स्फोटके वापरण्यात आली होती. या आयईडीचा स्फोट झाला असता तर मोठी हानी घडली असती, असे पोलिसांनी म्हटले आहे. तत्पूर्वी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्हय़ात शनिवारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी बिजबेहरा भागातील जबलीपुरामध्ये दोन नागरिकांवर गोळीबार केला होता.
Previous Articleस्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर
Next Article मुसळधार पावसाने रस्ते जलमय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.