प्रतिनिधी / पणजी
रद्द झालेल्या दहावी परीक्षेसाठी गुण देण्याचे धोरण अजूनही चर्चात्मक स्तरावर असून त्याचा अंतिम मसुदा अद्यापही तयार झालेला नाही. त्याची सविस्तर माहिती गोवा बोर्डाच्या वेबसाईटवर देण्यात येणार असून तिच अधिकृत समजावी, असा खुलासा बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी केला आहे.
सोशल मीडिया व प्रसार माध्यमात प्रकाशित झालेले वृत्त अर्धवट माहितीवर आधारित असून ते गोवा बोर्डातर्फे देण्यात आलेले नाही. या प्रकरणी एक-दोन दिवसात गोवा बोर्डातर्फे मार्क धोरण स्पष्ट करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.