बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बारावीची परीक्षा रद्द करून दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यात एसएसएलसी परीक्षा १९ आणि २२ जुलै रोजी झाली. या परीक्षेचा निकाल आज ७ ऑगस्ट रोजी लागणार होता पण काही कारणास्तव हा निकाल लांबणीवर टाकला आहे. माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने याविषयी स्पष्टीकरण देत शनिवारी निकाल जाहीर होणार नसल्याचे सांगितले आहे.
देम्यान, माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने निकाल जाहीर करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी मंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निकालाची तारीख जाहीर केली जाईल असे म्हंटले आहे.
दरम्यान, राज्याचे माजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी एसएसएलसी झाल्यांनतर निकाल १० ऑगस्टपर्यंत जाहीर होईल असे सांगितले होते. पण मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी राज्याचे माजी गृहराज्य मंत्री बसवराज बोम्माई यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. आता नवीन आमंत्रिमंडळ स्थापन झाल्याने परीक्षेचा निकाल नवीन मंत्री जाहीर करतील.