प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा मार्चऐवजी जूनमध्ये होणार आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक शिक्षण खात्याने जाहीर केले आहे. त्यानुसार 21 जून ते 5 जुलै या कालावधीत परीक्षा होणार आहे. शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी धारवाडमध्ये याविषयी माहिती दिली. याआधी परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यावर आक्षेप, सल्ले मागविण्यात आले होते. त्यांचा विचार करून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे यावेळीदेखील परीक्षा सुरक्षा व्यवस्थेत आणि सामाजिक अंतर राखून घेण्यात येईल. यंदा परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी सरकार आणि अधिकाऱयांवर आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
- 21 जून : प्रथम भाषा : मराठी, हिंदी, कन्नड, तामिळ, उर्दु, संस्कृत, तेलगु
- 24 जून : गणित
- 28 जून : विज्ञान
- 30 जून : तृतीय भाषा : हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दु, पर्शियन, अरेबिक, कोकणी, संस्कृत, तुळू
- 2 जुलै : द्वितीय भाषा : इंग्रजी/कन्नड
- 5 जुलै : समाजशास्त्र