सातारा / प्रतिनिधी :
सध्या संपूर्ण राज्यात दहावीच्या बोर्डाचे परीक्षा फॉर्म भरणे सुरू असून, अंतिम मुदत 11 जानेवारी आहे. पालकांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत, असे आवाहन भवानी विध्या मंदिरचे मुख्याध्यापक जीवन जोशी यांनी केले आहे.
लॉकडाऊन काळात बरीच कुटुंब स्थलांतरीत झाली असून, त्या मुलांना संपर्क करणे अवघड झाले आहे. त्यामुळे पालकांनी त्वरित शाळांशी संपर्क करून 10 वी चे फॉर्म भरून घ्यावे व शैक्षणिक नुकसान टाळावे.