कन्नडबरोबरच आता इंग्रजी माध्यम विद्यार्थ्यांसाठीही वर्गाचे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटात 2019-2020 या शैक्षणिक वर्षाची दहावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. मात्र या दरम्यान विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्टय़ा परीक्षेसाठी तयार रहावे, या उद्द्sशाने शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शन वर्ग व चिंतन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कन्नड माध्यमाबरोबरच आता इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीही सदर वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. मात्र मराठी माध्यम विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाकडे कानाडोळा करण्यात आला आहे.
इंग्रजी माध्यमासाठी चंदन वाहिनीवर मार्गदर्शन वर्गाचे प्रसारण होणार आहे. शनिवार दि. 9 मे पासून 7 जूनपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 9.30 ते 11 यावेळेत 45 मिनिटांचा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेच्या दृष्टीकोनातून प्रवाहात रहावे, या उद्देशाने शिक्षण विभाग बेंगळूरतर्फे सदर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. 29 एप्रिलपासून 28 मे दरम्यान कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चंदन वाहिनीवर दुपारी 3 ते 4.30 यावेळेत विषयांचे मार्गदर्शन वर्ग व दुसऱया दिवशी सकाळी 6 ते 7. 30 यावेळेत पुनर्पक्षेपण करण्यात येत आहे. सायंकाळी 5 ते 5.30 यावेळेत मक्कळवाणी हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. यामुळे दहावीच्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाने सुरू केलेला उपक्रम जूनच्या दुसऱया-तिसऱया आठवडय़ात होणाऱया परीक्षेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक ठरणार आहे.
कन्नड-इंग्रजी माध्यम विद्यार्थ्यांसाठी उपक्रम लाभदायक
कन्नड माध्यमासाठी सुरू असणारा उपक्रम विद्यार्थ्यांना लाभदायक ठरत आहे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनादेखील गणित, विज्ञान, समाज विज्ञान, तृतीय भाषा हिंदी, संस्कृत, उर्दू विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे सर्व विषयांची उजळणी होण्याबरोबरच प्रत्येक विषय या निमित्ताने अभ्यासला जाणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे शिक्षण विभागाला मराठीची कावीळ झाली असून शालेय जीवनाचा महत्त्वाचा टप्पा असणाऱया दहावीच्या मराठी माध्यम विद्यार्थ्यांना देखील डावलण्यात आले आहे. यामुळे मराठी माध्यमाच्या शिक्षकांची जबाबदारी वाढली असून या काळात विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याबरोबरच मार्गदर्शनाच्या दृष्टीकोनातून पावले उचलणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष
कोविड-19 मुळे दहावी परीक्षेला तारीख पे तारीख मिळत आहे. मात्र यावेळेत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, या उद्देशाने चंदन वाहिनीवर कन्नड, इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येत आहे. मात्र मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून पुन्हा मराठी माध्यम शाळांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून मराठी माध्यम शाळांवर सातत्याने अन्याय झाला असून कोरोनाच्या काळातही आता एसएसएलसी मार्गदर्शनामध्ये दुजाभाव करण्याचा प्रकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार ठरण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. यामुळे मराठी माध्यम शाळांनाच तसेच पालकांना निकाल वाढीच्या दृष्टीकोनातून लक्ष द्यावे लागणार आहे.