बेंगळूर : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळी नवी मार्गसूची जारी केली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने पहिली ते नववी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि दहावी वर्ग सुरू ठेवण्यासंबंधी दिलेल्या आदेशात बुधवारी किरकोळ बदल केला आहे. आता सर्व शाळा 22 एप्रिलपासून 4 मे पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या कालावधीत दहावीचे वर्गही बंद ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा दूरसंपर्क या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची मुभा देण्यात आली आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून 30 एप्रिलपर्यंत निकालपत्रक तयार करण्याचा आदेश देण्यात आला होता. आता ही प्रक्रिया 26 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची सूचना शिक्षण खात्याने सुधारित आदेशात दिली आहे. 27 एप्रिल ते 4 मे या कालावधीत दहावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना शाळेत हजर होण्यापासून सूट दिली आहे. परंतु, या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाईन किंवा फोनद्वारे संपर्कात राहून किचकट मुद्दय़ांविषयी मार्गदर्शन करावे, असे बुधवारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Previous Articleयादगीर जिल्हय़ात अपघातात पाच महिला ठार
Next Article खासगी शिक्षक, प्राध्यापकांना खूशखबर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.