प्रतिनिधी/ महाबळेश्वर
राज्य शासनाने कष्टकरी व गोरगरीब जनतेसाठी दहा रूपयांत शिवथाळीची जी योजना जाहीर केली आहे त्या योजनेच्या धर्तीवर येथील शिवसेनेच्या वतीने दहा रूपयांत शिवभोजन थाळी चा शुभारंभ आज जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे , माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर व अर्बन बॅकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी शिवसेनेचे माजी गोपाळ वागदरे तर युवासेनेचे उप जिल्हाप्रमुख सचिनवागदरे हे उपस्थित होते आज पहील्याच दिवशी पर्यटकांसह स्थानिकांनी या शिवथाळीचा लाभ घेतला
युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांनी या योजनेत भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे त्या नुसार प्रायोगित तत्वावर त्यांनी या शिवथाळी योजनेचा शुभारंभ येथील सुभाष चौकात केला या उद्घाटन समारंभासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती दुपारी उद्घाटन झाल्या नंतर मान्यवरांच्या हस्ते या शिवथाळीचे वाटप करण्यास प्रारंभ झाला शिवथाळी साठी येथील स्थानिकां बरोबर अनेक पर्यटकांनी रांग लावली होती दोन वाजता बंद होणाराहा भोजनकक्ष दुपारी तीन वाजे पर्यंत चालु ठेवण्यात आला होता काही दिवसांनी ही योजना सुभाष चौकाजवळ हॉटेल नुक्कडच्या समोर उत्साहपुर्ण वातावरणात सुरू करण्यात येणार आहे तसेच अशा प्रकारे या योजनेतुन शिवथाळी सुरू करणारे महाबळेश्वर हे जिल्हयातील पहीले शहर आहे असल्याची माहीती युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांनी दिली
या शिवथाळीच्या उद्घाटन समारंभासाठी शिवसेनेचे नगरसेवक संजय पिसाळ , नगरसेविका विमल ओंबळे , शिवसेनेच्या महीला आघाडी प्रमुख लिलार्ता शिंदे , माजी नगरसेवक संतोष शिंदे , आकाश साळुंखे , वनिता जाधव , राजश्री भिसे , राजेंद्र गुजर , सलिम बागवान , अभिजीत कानडे , चंद्रकांत पांचाळ , मनोज ताथवडेकर , प्रविण शिंदे , प्रविण कदम , गोविंद कदम , शुभम कुंभारदरे , अंकित पलोड , अक्षय काळे , शंकर ढेबे , राजेंद्र पंडीत , अनिल केळगणे , गणेश भोसले , केतन यादव व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते