प्रतिनिधी / कोल्हापूर
कारवाईची धमकी देऊन दहा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तीकर निरीक्षकास आज लाचलुचपत विभागाने अटक केली. प्रताप महादेव चव्हाण (वय ३४, रा. राजारामपुरी) असे त्याचे नाव आहे.
करवीर तालुक्यातील एका डॉक्टरकडे फोन करून चव्हाण याने पंचवीस लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. जर का पैसे दिले नाहीत तर कारवाई करू अशी धमकी दिली. चौदा लाखावर तडजोड झाली. शुक्रवारी रात्री लक्ष्मीपुरी परिसरात दहा लाख रुपये देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी रात्री विल्सन पुलाजवळ प्रत्यक्ष पैसे घेताना प्रताप चव्हाण याला अटक करण्यात आली.