नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चालू वर्षाच्या म्हणजेच 2022 च्या हज यात्रेमध्ये दहा लाख भाविकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सौदी अरेबियाने शनिवारी दिली. कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांत सौदी सरकारने भारतासह इतर देशांतील हज यात्रेकरूंना परवानगी दिली नव्हती. देशातील आणि बाहेरील भाविकांनाही यंदा यात्रेला जाणऱयांमध्ये समावेश असेल. मात्र, प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागेल. भाविकांना हजला जाण्यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून 65 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांनाच अनुमती देण्यात येणार आहे.