प्रतिनिधी/ खेड
खेड तालुक्यातील दहिवलीतील बाप-लेक कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्याच कुटुंबातील आणखी दोघींनी कोरोनावर मात केली आहे. या दोघींना सोमवारी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातून टाळय़ांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱया रूग्णांची संख्या देखील वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्याची संख्या 10 वर पोहचली आहे. भेलसई, बहिरवली, पन्हाळजे, दहिवली, मुरडे, कळंबणी, कुळवंडी येथील कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.