साहित्य : पापडीसाठीः 2 वाटय़ा मैदा, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, चवीपुरते मीठ, 3 चमचे तूप, तेल तळण्यासाठी, चाटसाठीः 2 बटाटे वाफवून छोटे तुकडे करून, 1 वाटी मटार वाफवलेले, पाव चमचा रेडचिल्लीफ्लेक्स, पाव चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा चाट मसाला पावडर, चवीपुरते मीठ, पाव वाटी दही, अर्धी वाटी चिंचेची चटणी, पाव वाटी शेव, सजावटीसाठीः कोथिंबीर, ग्रीन चटणी
कृती : बाऊलमध्ये पापडीसाठी दिलेले साहित्य मिक्स करून त्यात पाणी घालून गोळा मळावा. नंतर सुती कापडात 15 ते 20 मिनिटे गुंडाळून ठेवावा. नंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याची चपाती लाटावी. त्याच्यावर चमचाच्या सहाय्याने टोचे मारावेत. नंतर वाटीने त्यावर छाप मारून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. एका ताटात चार पापडी ठेवून त्यावर बटाटय़ाचे तुकडे, मटार आणि दही घालावे. वरून चाट मसाला, रेडचिल्लीफ्लेक्स, लाल तिखट पावडर आणि मीठ घालावे. वरून चिंचेची व ग्रीन चटणी आणि कोथिंबीर सजवावी. शेवटी शेव घालून पापडी चाट खाण्यास द्या.