साहित्य : 4 वाटय़ा दही, 1 चमचा मैदा, पाव चमचा हळद पावडर, 2 चमचे दूध, अर्धा चमचा जिरं, 1 कांदा बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, पाव इंच आलं खिसून, 1 टोमॅटो बारीक चिरून, 1 काकडी छोटे तुकडे करून, 2 चमचे तेल, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीरे
कृती : प्रथम बाऊलमध्ये दही घेऊन त्यात मैदा, हळद पावडर आणि दूध घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं टाकावे. नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची आणि आलं टाकून मिश्रण मिनिटभर परतवून घ्यावे. नंतर त्यात दही-मैद्याचे मिश्रण ओतावे. वरून मीठ घालून मिश्रण एकसारखे ढवळत उकळी काढावी. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि काकडीचे तुकडे टाकून मिश्रण एकसारखे ढवळत दोन मिनिटे गरम करावे. आता तयार दही शोरबा कोथिंबीरीने सजवून पिण्यास द्यावे.