प्रतिनिधी / मालवण:
पर्ससीन नेट मासेमारीकरिता बेकायदेशीररित्या वापरला जाणारा आणखी एक हंडीच्या आकाराचा एलईडी बल्ब शनिवारी दांडी समुद्रकिनारी आढळून आला.
महेंद्र पराडकर यांनी याबाबतची खबर मालवण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर आणि होमगार्ड योगेश पेंडूरकर यांनी पंचनामा करून हा बल्ब ताब्यात घेतला. यावेळी स्थानिक मच्छीमार सन्मेष परब, नारायण रोगे, यशवंत लोणे आदी उपस्थित होते. हंडी एलईडी बल्ब दांडी किनाऱयावर वाहून येण्याची गेल्या पाच दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. बेकायदेशीर एलईडी मासेमारीमुळे पोलीस यंत्रणा नाहक कामाला लागत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.