प्रतिनिधी / मालवण :
दांडी येथील राजेश कांदळगावकर यांची ‘सातेरी कृपा IND-5-NM-3451’ ही फायबरची मासेमारी नौका यमाहा इंजिनसह दांडी समुद्रातून गायब झाली आहे. शनिवारी सायंकाळी दांडी समुद्रात नांगरून ठेवलेल्या एका पर्यटन नौकेस सदरची नौका रस्सीने बांधून ठेवण्यात आली होती. रविवारी सकाळी रस्सी तुटलेली होती आणि नौका इंजिनसह गायब होती. मच्छीमारांनी दिवसभर समुद्रात शोधाशोध केली असता नौका सापडून आली नाही. तरी सदर नौका कुणाला समुद्रात किंवा समुद्रकिनारी आढळून आल्यास राजेश कांदळगावकर 9766073415 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.