सहा जणांना अटक : दांडेली ग्रामीण पोलिसांची कारवाई
वार्ताहर / दांडेली
उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दापाश केला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे साडे चार लाखांच्या खऱ्या नोटा आणि 72 लाखांच्या बनावट नोटांसह दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
किरण देसाई (वय 40), गिरीश पुजारी (वय 42) दोघेही रा. महाराष्ट्र , अमर नायक (वय 30) रा. बेळगाव , सागर सोन्नूरकर (वय 28), शब्बीर कुट्टी (वय 45), शिवाजी कांबळे (वय 52) अशी अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी दांडेली ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.