सर्पमित्र रजाक शहा यांनी सापाला सोडले जंगलात
दांडेली : 15 लांब व 40 किलो वजनाचा अजगर गणेशनगर दांडेली येथे मंगळवारी सकाळी सर्पमित्र रजाक शहा यांनी पकडून जवळच्या मावळंगी जंगलात वनविभागाच्या अधिकाऱयांच्या उपस्थितीत सोडून देण्यात आले.
गणेशनगर येथील रहिवासी नारायण व्ही. कलघुटकर यांच्या प्रांगणात अजगर दिसून आल्याची माहिती सर्पमित्र रजाक शहा यांना देण्यात आली. रजाक शहा व त्यांचा मदतनीस फारुक मंजील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अजगरास पकडून जंगलात सोडले, असे रजाक शहा यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या पाच-सहा महिन्यांत रजाक शहा यांनी नाग, कोब्रा, घोणस, मगर पकडून सुखरूपपणे जंगलात सोडून दिले आहेत.