मुंबई प्रतिनिधी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाबाहेर भाजप नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचं बॅनर धरुन घोषणाबाजी केली. ‘दाऊदच्या दलला मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का?’ अशी वाक्य या बॅनरवर लिहिण्यात आलेली. दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?… दाऊद का दलाल है…’ अशा घोषणा यावेळी भाजपाच्या आमदारांनी दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसेच इतर अनेक भाजपाचे आमदार उपस्थित होते.राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने संघर्षांचा संकल्प केलाय. हे सरकार दाऊद समर्पित असल्याची टीका करत फडणवीस यांनी बुधवारी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिले होते.