ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील सात मालमत्तांचा 10 नोव्हेंबरला लिलाव होणार आहे. तस्करी आणि विदेशी विनिमय हाताळणी कायद्याअंतर्गत हा लिलाव होणार आहे.
महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबाके गावात दाऊदच्या सहा जमीन आणि एक घर आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 10 नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या मालमत्तांचा लिलाव होईल. लिलावात बोली लावणारे 2 नोव्हेंबरला मालमत्तेची तपासणी करू शकतात, असे सेफमा अधिकाऱ्याने सांगितले. 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज पूर्ण होतील आणि निविदाधारकांमार्फत ठेवी जमा केल्या जातील. अशा तीन प्रक्रियांद्वारे 10 नोव्हेंबर रोजी ई-लिलाव, निविदा आणि सार्वजनिक निविदा पूर्ण केल्या जातील.
27 गुंठे जमीनची -राखीव किंमत 2,05,800 रुपये,29.30 गुंठे जमीन – राखीव किंमत 2,23,300 रुपये,24.90 गुंठे जमीन – राखीव किंमत 1,89,800 रुपये,20 गुंठे जमीन – राखीव किंमत 1,52,500 रुपये,18 गुंठे जमीन – राखीव किंमत 1,38,000 रुपये तर 30 गुंठे जमीन असलेले घराची राखीव किंमत6,14,8100 रुपये ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीच्या सांताक्रूझ येथील एका निवासी इमारतीत असलेल्या 2 रहिवासी फ्लॅटचाही लिलाव करण्यात येणार आहे. त्या फ्लॅट्सचे क्षेत्रफळ 1245 चौरस फूट असून, याची किंमत अंदाजे 3.45 कोटी रुपये आहे.