प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दादबानहट्टी क्रॉसवर (यमकनमर्डी) रविवारी डीसीआयबी व यमकनमर्डी पोलिसांनी 300 किलो चांदीच्या विटा व दागिने जप्त केले आहे. डस्टर कारमधून हुपरीहून (जि. कोल्हापूर) तामिळनाडूतील सेलमला हा साठा नेण्यात येत होता. जप्त चंदीची किंमत 63 लाखा इतकी होते.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी रविवारी रात्री ही माहिती दिली आहे. डीसीआयबी व यमकनमर्डी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून या कारवाईचे पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.