श्री यल्लम्मा देवीच्या लाखो भाविकांचे सढळ हस्ते दान
वार्ताहर / बाळेकुंद्री
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिराची दानपेटी नुकतीच खोलण्यात आली. गेल्या वीस दिवसांत भक्तांनी सढळ हस्ते दिलेल्या या दानपेटीत 53 लाख 80 हजार रुपयाचा निधी जमा झाल्याची माहिती देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवि कोटारगस्ती यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
यंदा कोरोनाकाळातही यल्लम्मा देवीच्या भक्तांनी रेणुकाचरणी मोठय़ा प्रमाणात देणगी अर्पण केली आहे. दानपेटींतील दानाची गेल्या दोन दिवसांपासून भाविकांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यल्लम्मा देवस्थानचे उत्पन्नात घट
रेणुका देवी यल्लम्मा देवस्थानच्या गेल्या वार्षिक महसूल उत्पन्नात वाढ झाली होती. दरवर्षी एकेकाळी यल्लम्मा देवस्थानचे वार्षिक उत्पन्न चार कोटीहून अधिक होते. यंदा कंकण मंगळसोहळा, शाकांबरी व माघी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारी यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे महसुलात घट झाली आहे. यात्रेत मोठय़ा प्रमाणात सोने-चांदीसह रोख रक्कम देवीला अर्पण करतात. या निधीचा वापर देवस्थान परिसरात हाती घ्यावयाच्या विकासकामांसाठी करण्यात येतो.
जिल्हाधिकारी व यल्लम्मा मंदिराचे शासनाधिकारी यांची देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकाऱयांनी रितसर अनुमती घेऊन 24 मार्च रोजी दानपेटी खोलण्यात आली होती. दानपेटीत एकूण 53 लाख 80 हजार रुपये आले आहेत. देशातील अनेक स्थळापैकी बेळगाव जिल्हातील सौंदत्ती तालुक्यातील यल्लम्मा डोंगर एक आहे.
यावेळी साहाय्यक आयुक्त बसवराज जिरगाळ, तहसीलदार डी. एन. जाधव, देवस्थानचे साहाय्यक कार्यदर्शीनी नागरत्ना बोळीन, अरविंद माळगे, एस. एल. यलिगार, डी. आर. चव्हाण, मुद्देगौड्र, अल्लमप्रभू प्रभूनवर व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.