दोन वर्षापासून प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित, : साविआकडून इमारतीच्या डिझाईनसाठी भरवली होती स्पर्धा,बांधकाम विभाग म्हणतोय इस्टीमेट तयार करण्याचे सुरु काम
प्रतिनिधी /सातारा
सातारा पालिकेची सध्या इमारत ही टोकडी पडत आहे. प्रशस्त अशी इमारत असावी या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षापूर्वी पालिकेच्या सभागृहात ठराव होवून साताऱयाचे दानशुर असलेले कल्याणी यांनी पालिकेला 1 रुपयात जागा देवू केली. जागेची कागदपत्रे नावावर करण्यात आली. जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे. याच जागेवर पालिकेची नवीन वास्तू कशी असावी याकरता पालिकेच्यावतीने डिझाईनराची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, या नव्याने होणाऱया पालिकेच्या इमारतीच्या बांधकामाबाबत कुठेच हालचाल नाही. दरम्यान, पालिकेचा बांधकाम विभाग म्हणतोय इस्टीमेट तयार करण्याचे काम सुरु आहे. सातारकरांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.
सातारा पालिकेच्या सध्याच्या असलेल्या इमारतीला अनेक वर्ष झालेली आहेत. तसेच प्रशस्त अशी इमारत नाही त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिकेची वास्तू असावी या विचारातून पालिकेने साताऱयाचे दानशुर असलेल्या कल्याणी यांच्याकडे विचार मांडताच त्यांनी केवळ एक रुपयामध्ये जागा पालिकेला देवू केली. पालिकेच्या नावावर जागा केल्यानंतर नवीन इमारती कशी असावी याकरता डिझाईनरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. एका डिझाईनरने ही स्पर्धा जिंकून चांगले डिझाईन बनवले होते. मात्र, त्यापुढे त्या इमारतीकरता फंडींग कधी उपलब्ध होणार?, निविदा प्रक्रिया कधी निघणार?, काम कोणाला दिले जाणार?, कधी प्रत्यक्ष कामाला सुरु होणार?, सत्ताधारी सातारा विकास आघाडीकडून नेमका पाठपुरावा कुठपर्यंत सुरु आहे हे मात्र, हे सर्व गुलदस्त्यात आहे.
पालिकेच्या नवीन इमारतीबाबत सत्ताधाऱयांकडूनच चुप्पी साधली जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सातारा पालिकेच्या पदाधिकाऱयांनी त्यावेळी गाजावाजा केला होता. अद्याप मात्र त्यावर काहीच हालचाली झाल्या नसल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर नारळ फुटणार काय असाही प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
इस्टीमेटचे काम सुरु आहे
नव्याने होणाऱया सातारा पालिकेच्या इमारतीच्या इस्टीमेटचे काम पालिकेकडून सुरु आहे. लवकरच ते पूर्ण होईल. त्यानंतर प्रशस्त इमारतीचे काम सुरू होईल. दिलीप चिद्रे, नगरअभियंता