प्रतिनिधी / दापोली
ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी आरक्षण सोडतीबाबत सभा 15 डिसेंबर रोजी दापोली शहरातील नवभारत छात्रालयाच्या शिंदे गुरुजी सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता होणार आहे.
यासाठी उपस्थित राहताना कोविड-19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात यावे, तसेच कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून सभेच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे, मास्कच, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. अशा लेखी सूचना तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे.
राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी आपले तालुक्यातील 106 ग्रामपंचायतीचे सरपंच पदांचे आरक्षण मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे कडील दिनांक 2 डिसेंबर 2020 चे आदेशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री इत्यादी प्रवर्गाचे आरक्षण तरी सदर सरपंच पदाच्या आरक्षणाचे सभेसाठी उपस्थित रहावे ही विनंती. सर्व सरपंच, ग्रा. पं. सदस्य व संबंधितांनी उपस्थित रहावे असे आवाहन देखील तहसीलदार यांनी केले आहे.