वार्ताहर / मौजेदापोली
दापोली तालुक्यात मच्छीची आवक घटली आहे. यामुळे मासळीचे दर गगनाला भिडत आहेत. दापोली मच्छीमार्केटमध्ये म्हाकूल, सुरमई, पापलेट, कोळंबी आदी चविष्ट माशांच्या दरात तब्बल दुप्पट वाढ झाली असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे.
त्यात आता नाताळ सण आल्याने सलग सुट्ट्या लागून आल्या आहेत. त्याचबरोबर थर्टीफस्ट जवळ आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीची मागणी आहे. समुद्रातील मत्स्य टंचाईबरोबर डिझेलचे दर देखील गगनाला भिडले आहेत. अशा अनेक अडचणी मच्छीमारांसमोर आहेत. त्यात मासळीची आवक घटल्यामुळे मासळी चढ्या भावाने विकली जात असल्याचे मच्छीविकेत्यांकडून समोर आले आहे.