वार्ताहर/ मौजे दापोली
दापोलीत गेले 2 ते 3 दिवस वादळासह पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बुधवारीही पावसाचा जोर कायम असल्याने अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दापोलीत बुधवारी सकाळपर्यंत 98 मि. मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी झालेल्या पावसाने पालगड येथील प्रकाश पवार यांच्या घराजवळील दरड कोसळली आहे. मात्र घराचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. मंगळवारी झालेल्या पावसामुळे दिवसभर वीज गायब झाली होती. सायंकाळी वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र बुधवारी झालेल्या पावसामध्ये कोणतीही आपत्तीची नोंद झाली नसल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पुन्हा चक्रीवादळाची आठवण
पावसासोबत वाऱयाचा वेग अधिक असल्याने ग्रामस्थांचा निसर्ग चक्रीवादळाच्या आठवणीने थरकाप उडत आहे. यामुळे घराशेजारी मोठी झाडे असणारे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.