प्रतिनिधी/ दापोली
तालुक्यातील हर्णेजवळील नवानगर येथे रविवारी आणखीन एक डॉल्फीन मृतावस्थेत आढळून आला. त्यास ग्रामस्थांनी वनविभागाच्या सहाय्याने किनाऱयालगतच दफन केले. कोकणातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. दिवसाच्या तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. याचा समुद्रातील जीवावरही विपरित परिणाम जाणवत आहे. यामुळे एका महिन्यामध्ये 3 डॉल्फीनचा मृत्यू दापोलीच्या समुद्रकिनारी झाल्याचे बोलले जात आहे. या तीनही डॉल्फीनना समुद्रकिनारी खड्डा मारून तेथेच पुरण्यात आले. या कामी दापोलीचे वनक्षेत्रपाल वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखालीन वनपाल गणेश खेडेकर, वनपाल सुरेखा जगदाळे यांनी पुढाकार घेतला