प्रतिनिधी / दापोली
दापोली नगर पंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत शिवसेना आणि काँग्रेस यांची युती होणार असल्याची माहिती खेड दापोली मतदारसंघाचे शिवसेना आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेने काँग्रेस सोबत या निवडणुकीत युती करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी मनसेला जवळ करेल अशी अटकळ बांधली जात आहे. तशी चर्चा देखील दापोलीमध्ये सुरू आहे. मात्र या गोष्टीची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षाकडून करण्यात आलेली नाही. तसे झाले तर मात्र या निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा स्वबळावर लढणार असल्याचे चित्र दिसत आहे.