दापोली / मौजे दापोली
राज्य सरकारच्या यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत दापोली पंचायत समितीची तपासणी नुकतीच करून मूल्यमापन करण्यात आले. या तपासणीचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर दापंस स्पर्धेत आल्यास पुन्हा शासन स्तरावरून तपासणीसाठी पथक दाखल होणार आहे.
पहिल्या फेरीमध्ये रत्नागिरी जिल्हामध्ये पंचायत राज अभियानात दापोली पंचायत समिती प्रथम आली होती. त्यानंतर उच्चस्थानाकरीता पुन्हा ठाणे येथील उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांचे पथक दापोली पंचायत समितीमध्ये दाखल झाले होते. या पथकाने पं. स. च्या व्यवहार, कामकाज आदी घटनांचा अभ्यास केला असून तशी पाहणी केली आहे.
हे पथक आता दोन दिवसात पंचायत समिती पाहणी अहवाल राज्य शासनाकडे सादर करणार आहे. परंतु या अहवालात दापोली पंचायत समिती पास झाली असल्यास राज्य शासनाचे पुन्हा एक वरिष्ठ पथक दापोलीत दाखल होणार आहे. त्यानंतर हे पथक पुन्हा दापोली पं. स. चा अभ्यास, पाहणी, तपासणी करणार असल्याचे दापोली पंचायत समितीकडून चौकशी दरम्यान समोर आले. परंतु जिल्ह्यात पास झालेली दापोली पंचायत समिती वरिष्ठ पथकाच्या तपासणीत पास होईल ना याकडे दापोलीकरांचे लक्ष लागून राहीले आहे.