मौजे दापोली / वार्ताहर
दापोली पोलीस ठाणे हद्दीतील बुरोंडी चेक पोस्ट येथे पोलीस विभागा तर्फे दापोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर पर्यटकांना समुद्र किनारी योग्य ते खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सह. पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, उपनिरीक्षक शिगवण, वाहतूक विभागाचे हेड कॉन्स्टेबल बोरकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.