दापोली / प्रतिनिधी
दापोली शहरातील बसस्थानकातील दुकानाला शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील जवळजवळ सर्व सामान जळून खाक झाले.
दापोली बस स्थानक असणाऱ्या श्री गाला यांच्या खाद्यपदार्थ दुकानाला शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात असणाऱ्या नागरिकांनी व बाजारपेठ येथील युवकांनी धाव घेतली तसेच नगरपंचायतीचा अग्निशमन बंब देखील घटनास्थळी दाखल झाला. या बंबाच्या सहाय्याने नागरिकांनी आग विसरण्याचा प्रयत्न केला मात्र थोड्या वेळाने ही आग पुन्हा भडकली यानंतर पुन्हा पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली.
यावेळी बंबातील पाणी संपल्याने तो मध्यरात्री पुन्हा भरून आणण्यात आला व पुन्हा पाण्याचा मारा करण्यात आला. या आगीमध्ये श्री गाला यांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. यावेळी एसटी स्टँडवर कोरोना बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस मित्र, आरोग्य सेवक यांनीदेखील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे