प्रतिनिधी/ दापोली
शहरातील बसस्थानकातील दुकानाला शुक्रवारी रात्री 11.च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत खाद्यपदार्थांच्या दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. विद्या कुडाळकर यांच्या मालकीचे हे दुकान आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुकानाला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नगरपंचायतीचा अग्निग्शमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. या बंबाच्या सहाय्याने नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र थोडय़ावेळाने ही आग पुन्हा भडकली. यानंतर पुन्हा पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी बंबातील पाणी संपल्याने तो मध्यरात्री पुन्हा भरून आणण्यात आला व पुन्हा पाण्याचा मारा करण्यात आला. या आगीमध्ये कुडाळकर यांच्या दुकानाचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी एसटी बसस्थानकावर कोरोना बंदोबस्ताला असणाऱया पोलीस मित्र, आरोग्य सेवकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.