प्रतिनिधी /वास्को
आयएनएस दाबोळी येथील धावपट्टीवर विमान अपहरणविरोधी संयुक्त सराव मंगळवारी घेण्यात आला. या वार्षीक सराव उपक्रमात भारतीय नौदल, केंद्रीय औधोगीक सुरक्षा दल, भारतीय विमानतळ प्राधिकरण, गृह खाते, आयबी, आरोग्य खाते, पोलीस व संबंधीत शासकीय विभाग सहभागी झाले होते. या विमान अपहरणविरोधी सरावाव्दारे सुरक्षा व सेवा यंत्रणांची तत्परता व कार्यक्षमता तपासण्यात आली.
नागरी हवाई उड्डाण सुरक्षा विभागाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हा विमान अपहरणविरोधी सराव दाबोळीच्या धावपट्टीवर घेण्यात आला. संबंधीत यंत्रणांकडून या सुरक्षा उपक्रमाला योग्य प्रतिसादही मिळाला. विमान अपहरणासारखी घटना घडल्यास निर्माण होणाऱया आणीबाणीच्या परिस्थितीला कोण किती तत्परतेने आणि कार्यक्षमपणे सामोरे जाऊ शकतो याची चाचपणी या सरावाव्दारे करण्यात आली. एनएसजी, मरीन कमांडोस. पोलीस, सीआयएसएफ यांच्या जलद कृती पथकानेही विमान अपहरणाच्या घटनेवेळी धाव घेऊन कतृत्व दाखवले.
विमान अपहरणविरोधी सराव वेळोवेळी घेण्यात येत असतात. अशा एखादय़ावेळी विमान अपहरणाचा प्रसंग उद्भभवल्यास संबंधीत संस्था व यंत्रणांमध्ये आवश्यक असलेले सहकार्य वाढवण्यासाठी असे सराव मदतकारक ठरत असतात.