प्रतिनिधी/ पणजी
कॉन्कर इव्हेन्ट या अस्थापनाने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रजासत्ताक दिनानिमित्त रोषणाई केली असून एकूण 40 हजार चौरस फूट मोठी विद्युत व्यवस्था सर्वांचे आकर्षण ठरले आहे.
कॉन्कर इव्हेन्ट या इव्हेन्ट मॅनेजमेंट आस्थापनाचे प्रमुख उपेन्द्र पै रायकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे यापूर्वी त्यांनी ख्रिसमस ते नववर्ष म्हणजे 24 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत याच इमारतीवर रोषणाई केली होती. गेली 10 वर्षे सदर अस्थापन संपूर्ण भारतात आयोजन क्षेत्रात प्रवीण असून रोषणाईच्या क्षेत्रात पाउल ठेऊन मानाचा तुरा मिळवल्याचे ते म्हणाले.