प्रतिनिधी / पणजी
येथील विद्या प्रबोधिनी हायस्कूलचे जेष्ट शिक्षक,समाजसेवक तथा मारुती मंदिराचे पुजारी दामोदर जोशी (59) यांचे आज सकाळी निधन झाले.ते मूळ हेदोस वाळपई येथील रहिवाशी पण सद्या पर्वरी येथे स्थायिक झाले होते. एक उत्कृष्ट विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून पर्वरी परिसरात परिचित होते.विद्या प्रबोधिनी हायस्कूलच्या स्थापनेपासुनचे शिक्षक व नंतर त्यांना विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयात बढती देण्यात आली.ते हिंदी हा विषय शिकवीत होते.ते गेली 30 वर्षे विद्यादानाचे काम करीत होते. महाराष्ट्र राष्ट्रभाषा परिषद पुणे’ या संस्थेचे ते गोवा प्रमुख होते.या परिषदेमार्फत त्यांनी हिंदी भाषेचा गोव्यातील कानाकोपऱयात प्रचार आणि प्रसार केला.तसेच ते मारुती मंदिराचे विश्वस्त होते.त्यांचा या मंदिराच्या पुननिर्माण कार्यास सिंहाचा वाटा आहे. ते मारुती मंदिराचे पुजारी असल्याने येथील अनेक घराण्याशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते.ते बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.त्यानंतर त्यांच्यावर भाजप पक्षाने हळदोणा मतदार संघाची जबाबदारी सोपवली होती. ते या पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते होते.अनेक वेळा ते पक्षाचा प्रचार करण्यासाठी प्रचार गाडीत फिरून पक्षाची ध्येय धोरणा लोकांना सांगत होते.त्याने आजवर त्यांच्यावर सोपविलेल्या अनेक जबाबदाऱया यशस्वी हाताळल्या आहेत.ते सूर्य फाउडेशन या संस्थेचे सदस्य होते.आम्ही दामोदर जोशी यांच्या रूपाने एक चांगला शिक्षक ,कार्यकर्ता मुकलो आहोत.त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.ही ईश्वर चरणी प्रार्थना .अशा शब्दात संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर यांनी शोक प्रगट केला.तसेच त्यांच्या बरोबर सचिव राजेंद्र भोबे,व्यवस्थापक दत्ता नाईक,प्राचार्य दामोदर म्हार्दोळकर, अवधूत पर्रीकर,राजकुमार देसाई,मुख्याद्यापक ,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी विद्या,मुलगा तेजस ,सून ,मुलगी तन्वी,भाऊ देवेंद्र व आई असा परिवार आहे. त्यांच्यावर वाळपई येथे त्यांच्या मूळ गावी अत्यसंस्कार करण्यात आले.