प्रतिनिधी /बेंगळूर
दाम्पत्यासह मुलीचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बागलकोट जिल्हय़ाच्या बदामी तालुक्यातील शिवयोगी मंदिराजवळ रविवारी घडली. विश्वनाथ माविनमरद (वय 30), त्यांची पत्नी श्रीदेवी माविनमरद (वय 26) आणि मुलगी नंदिनी अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणानिमित्त विश्वनाथ आपल्या कुटुंबासह शिवयोगी मठाला गेले होते. दरम्यान, मलप्रभा नदीत पाय धुण्यासाठी गेल्यानंतर तिघांचा बुडून मृत्यू झाला. पत्नी श्रीदेवीचा मृतदेह सापडला असून पती विश्वनाथ आणि मुलगी नंदिनीच्या मृतदेहाचा शोध अग्निशमन दलाचे कर्मचारी घेत आहेत. या घटनेची नोंद बदामी पोलीस स्थानकात झाली आहे.