प्रतिनिधी/ सातारा :
कोरोनामुळे तब्बल 50 दिवस दारूचे दुकाने बंद होती.सातारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी आदेश काढण्याच्या हालचाली सुरू करताच दुकान मालकांनी दुकानांची साफसफाई केली अन पुन्हा सावजाच्या शोध घेण्यासाठी तयार झाले.बुधवारी सकाळी सातारा शहरासह जिह्यातील दारूच्या दुकानाबाहेर मध्यपींच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.काही ठिकाणी सोशल डिस्टनन्सचा फज्जा उडाला होता.दुकानाचे कर्मचारी आणि बंदोबस्ताला असलेल्या कर्मचायांची तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसत होते. सातारा शहरासह जिह्यातील आज सकाळी दारूच्या दुकानांचे शटर ओपन झाले.शहरातील दारूच्या दुकानाबाहेर मध्यपींची सकाळीच नंबरला उभे राहण्याची घाई गडबड झाल्याचे दिसत होते.दुकानदारांनी तर नियमाच्या चौकटीत विक्री करता यावी यासाठी स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत केल्याचे दिसत होते.जो ग्राहक रांगेत उभा राहत नाही त्याला दुकानदारच टोले देत असल्याचे काही ठिकाणी चित्र दिसत होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदार आपल्या कामगारांना काळजी घेण्याची साधने दिली होती.काही दुकानाबाहेर बंदोबस्त असून ही फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.