प्रतिनिधी / कुडाळ
दारूबंदीच्या जावळी तालुक्यामध्ये तालुक्याचे मुख्य गाव मेढा येथे गांधीनगर वसाहतीमध्ये पती आणि पत्नी यांचा प्रमाणापेक्षा जास्त दारू पिऊन घरातच मृत्यू झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद मिळण्या पोलिस स्थानकामध्ये झाली आहे. यासंदर्भात घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावळी तालुक्यामधील गांधीनगर येथे राहणारे अनिल शिवराम काटेकर वय 40 व शेवंता अनिल काटेकर वय 35 गांधीनगर राहणार मेढा आज दुपारपासूनच या पती-पत्नी मी स्वतःच्या राहत्या घरात प्रमाणाच्या बाहेर दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू केला होता.
अति मद्य प्राशन झाल्यानंतर ते बेशुद्धावस्थेत गेले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे त्यामुळे दारूबंदीचा जावळी तालुक्यामध्ये चक्क मेढा तालुका जावळी येथे एका घरामध्ये पती आणि पत्नी चा दारू पिऊन मृत्यू होणे ही खेदजनक बाब बोलली जात आहे जावळी तालुक्यात सध्या अवैद्य दारू चा सुळसुळाट झाला असून उत्पादन शुल्क विभागाच्या मेहेरबानीने जावळी तालुक्यामध्ये दारू महापूर वाहू लागला आहे यापूर्वी जावळी तालुक्यामध्ये दारू पिऊन मृत्यू झाला असल्याची अनेक घटना घडल्या आहेत.
तर दारू पिऊन आत्महत्या करणार याची देखील घटना घडली आहे मात्र जावळी तालुक्यामध्ये पती आणि पत्नी चा अति मद्यप्राशन करून मृत्यू होणे ही पहिल्यांदाच घटना घडल्याने यासंदर्भात खळबळ माजली आहे मेढा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.