ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला सशर्त परवानगी दिल्यानंतर दिल्लीतील दारू दुकानांबाहेर झालेली गर्दी टाळण्यासाठी दिल्ली सरकारने दारूवर 70 % ‘स्पेशल कोरोना टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत आजपासून दारूवर हा कर आकारण्यात येणार आहे.
महिनाभरानंतर दारुची दुकाने उघडल्याने देशभरातील सर्वच दारू दुकानाबाहेर काल लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगला फज्जा उडाला. दिल्ली सरकारने यावर मार्ग काढत दारूवर 70 टक्के कोरोना टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला.
आजपासून (मंगळवार) दिल्लीत दारूच्या एमआरपीवर 70% स्पेशल कोरोना टॅक्स आकारला जाणार आहे. सोमवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने काढला. तसेच ज्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही त्या दुकानांना दारू विक्रीची परवानगी नाकारण्यात येईल, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला आहे.