बुधवारी पहाटे वाळपईत घटना
वाळपई / प्रतिनिधी
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नवोदय विद्यालयाच्या इमारती पासून अवघ्याच अंतरावर असलेल्या एका भाडोत्री घरांमध्ये राहणाऱया परप्रांतीय मजुराने आपल्या पत्नीच्या डोक्मयावर दगड घालून खून करण्याचा प्रकार घडला आहे. या आरोपाखाली पतीला अटक करण्यात आली असून त्याला गुरुवारी सकाळी वाळपई प्रथम न्यायदंडाधिकारी समोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. ही घटना बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भाची माहिती अशी की एका भाडोत्री घरांमध्ये राहणाऱया रुद्रवा तेलगडी (30 मुळ चित्तूर कर्नाटक) व त्यांचे पती देवाप्पा तेलगडी (35) यांच्यामध्ये सातत्याने भांडणे होत होती. गेल्या दोन वर्षापासून यामुळे त्याची पत्नी पूर्णपणे कंटाळली होती यामुळे काही दिवस आपल्या नातेवाईकाकडे जाऊन राहिली होती.अवघ्याच दिवसापूर्वी ती आपल्या पतीकडे राहायला आली होती.
बुधवारी दारूसाठी पैशाची मागणी.
दरम्यान पोलिस यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार देवाप्पा तेलगडी यांनी मंगळवारी संध्याकाळी आपल्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र तिने यासाठी नकार दिला यामुळे त्यांच्यादरम्यान कडाक्मयाचे भांडण झाले. अशाच वेळी रात्री ती झोपी गेली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पती देवाप्पा यानी चिऱयाचा दगड तिच्या डोक्मयावर घातल्यामुळे ती जागीच गतप्राण झाली अशी माहिती आरोपीने दिल्याचे पोलीस यंत्रणेने स्पष्ट केले.
या संदर्भाची माहिती बुधवारी सकाळी वाळपई पोलिस यंत्रणेला मिळताच निरीक्षक सागरे एकोस्ककर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व या संदर्भाची संपूर्ण चौकशी करण्यात आली. मयत रुद्रवा हीचा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. यासंदर्भात पंचनामा करून मृतदेह वाळपई सामाजिक रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱयांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार काही वर्षांपूर्वी दोघाचे लग्न झाले होते. त्यांना तीन मुले आहेत मात्र ती नातेवाईकांच्या घरी राहतात. हे जोडपे गेल्या काही वर्षापासून वाळपईत मिळेल त्या ठिकाणी कामाला जातात.
दरम्यान यासंदर्भात सविस्तर पंचनामा करून अधिक तपासासाठी पोलीस खात्याच्या फॉरेन्सिक पथकाला बोलविण्यात आले. आवश्यक स्वरूपाचे नमुने गोळा करण्यात आलेले आहेत. दरम्यान पत्नीच्या खुनासाठी जबाबदार असलेले पती देवाप्पा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा आरोप दाखल करण्यात आलेला आहे. त्याला गुरुवारी सकाळी वाळपई प्रथम न्यायदंडाधिकाऱयांसमोर उभे करण्यात येणार असून यासंदर्भातील सविस्तर चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले.