प्रतिनिधी/सांगली
सांगली-माधवनगर रस्त्यावर शनिवारी रात्री तिघेजण दारू पिऊन दंगा करत होते. तसेच येणाऱया जाणाऱयाला अडवत होते. त्यावेळी सांगली शहर पोलीस त्याठिकाणी आले. या तिघांना ताब्यात घेतले असता यामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे कार्यरत असणारा पोलीस नाईक किशोर रघुनाथ कदम हा होता. त्याच्याविरोधात सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांच्याकडे पाठविण्यात आल्यावर त्याचे तात्काळ अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी निलंबन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री सांगली-माधवनगर रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ तिघेजण दारू पिऊन दंगा करत होते. त्यावेळी सांगली शहर पोलीस त्याठिकाणी आले या तिघांना ताब्यात घेतले त्यामध्ये जहाँगिर सलीम शेख वय 34 रा. मंगळवार बाजार सांगली, अझर बिलाल शेख वय 36 रा. अभयनगर आणि पोलीस नाईक किशोर कदम हा होता. त्यामुळे या तिघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर किशोर कदम याचे पोलीस अधीक्षकांनी तात्काळ निलंबन केले आहे.