दोघांविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
लिंब ता. सातारा येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाला असून मारहाण करणाऱया दोघांविरूद्ध सातारा शहर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी चंद्रकांत कृष्णा खंडुझोडे हे दि. 19 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास लिंब येथे राहत असलेली त्यांची बहिण या घरासमोर मेहूण्यासोबत बोलत उभे होते. यावेळी संशयित दौलत भिसे हा तिथे आला. आणि त्याने चंद्रकांत यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. यावेळी चंद्रकांत यांनी पैसे देण्यास नकार दिला. म्हणून दौलत याने पी व्ही सी प्लास्किटच्या पाईपने त्याना मारहाण केली. तर अशोक खंडूझोडे याने लाथाबुक्काने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. या मारहाणीत ते चंद्रकांत जखमी झाल्याने त्यानी दौलत गणपत भिसे व अशोक लक्ष्मण खंडुझोडे यांच्या विरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.