नवी दिल्ली
दालमिया भारत शुगर ऍण्ड इंडस्ट्रीज (डीबीएसआयएल) यांच्याकडून व्यवसाय ते ग्राहक या मोहिमेंतर्गत ‘दालमिया उत्सव ब्रँड’ या नावाने पॅकिंगमधील साखरेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. दालमिया उत्सव नावाने साखर ग्राहकांसाठी उपलब्ध करताना अत्यानंद होत असून सदरची साखर उत्पादन करताना जागतिक पातळीवर पर्यावरणाशी अनुकूल असे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे गुणवत्ताही चांगली ठेवली जाणार असल्याचे डीबीएसआयएलचे संचालक बी.बी. मेहता यांनी स्पष्ट केले आहे.
पहिल्या टप्प्यात योजना 12 राज्यात
याअंतर्गत 12 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात सुरूवातीला ब्रँडेड पॅकेज आणि पाउचमध्ये साखरेची उपलब्धता केली जाणार आहे. या राज्यांमध्ये दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, मध्यप्रदेश, चंदीगढ, बिहार तसेच पश्चिम बंगालचा समावेश राहणार आहे.