जानेवारीत आयएमडीबी मानाकंनात ‘जीत की जिद’ अव्वल
2021 च्या प्रारंभी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुमारे 11 चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाले आहेत. यातील अनेक चित्रपटांनी आयएमडीबीकडून (इंटरनेट मूव्ही डाटा बेस) 8 पेक्षा अधिक अंकांचे मानांकन प्राप्त केले आहे.
जीत की जिद
मानांकन – 8.6/10
प्लॅटफॉर्म ः झी5
प्रदर्शन ः 22 जानेवारी
कलाकार ः अमित साध, मृणाल कुलकर्णी, गगन रंधावा
दिग्दर्शक ः विशाल मंगलोरकर
सीरिजची कथा कारगिल नायक मेजर दीप सेंगर यांच्यावर बेतलेली आहे. कारगिलमध्ये गोळी लागल्याने दिव्यांग झालेले मेजर कशाप्रकारे पुन्हा पुनरागमन करतात हे यात दाखविण्यात आले आहे.
राम प्रसाद की तेरहवी
मानांकन ः 7.8/10
प्लॅटफॉर्म ः जियो सिनेमा
प्रदर्शन ः 1 जानेवारी
कलाकार ः नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, सुप्रिया पाठक, परमव्रता चटर्जी, विनय पाठक, विक्रांत मेस्सी आणि मनोज पहवा
दिग्दर्शक ः सीमा पहवा
टाळेबंदीनंतर चित्रपटगृहे खुली झाल्यावर व्यापक स्तरावर प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कुटुंबप्रमुख रामप्रसाद यांच्या निधनानंतर तेराव्याच्या विधीत सामील होण्यासाठी आलेल्या अन्य कुटुंबीयांमध्ये कशाप्रकारे भांडण होतात हे यात दर्शविण्यात आले आहे.
मारा
मानांकन ः 7.7/10
प्लॅटफॉर्म ः अमेझॉन प्राइम
प्रदर्शन ः 8 जानेवारी
कलाकार ः आर. माधवन, श्रद्धा श्रीनाथ, शिवधा, अभिरामी, मौली.
दिग्दर्शक ः दिलीप कुमार
तमिळ भाषेतील या रोमांटिक ड्रामा चित्रपटात आर. माधवन आणि श्रद्धा श्रीनाथ मुख्य भूमिकेत आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या चार्ली या मल्याळम चित्रपटाचा हा तमिळ रिमेक आहे.
वांदा व्हिजन
मानांकन ः 7.6/10
प्लॅटफॉर्म ः डिस्ने प्लस हॉटस्टार
प्रदर्शन ः 15 जानेवारी
कलाकार ः एलिझाबेथ ओल्सन, पॉल बटाली
दिग्दर्शक ः मॅट शाकमॅन
चित्रपटात सुपरहिरो पात्र वांदा मॅक्सीमॉफ आणि व्हिजनची पुढील कथा दाखविण्यात आली आहे. दोघेही स्वतःची शक्ती त्यागून आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना काही तरी चुकीचे घडत असल्याची जाणीव होते.