ऑनलाईन टीम/ मुंबई :
छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों मे’, ‘एक रुका हुआ फैसला’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. दुपारी २ वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
70 आणि 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीला सत्याच्या पृष्ठभागावर आणण्याच्या प्रयत्न त्यांनी केला. बासू यांनी चित्तचोर, रजनी, बातो बातो में, उस पार, खट्टा-मीठा, पिया के घर, चक्रव्यूह, जिना यहा, प्रियात्मा, स्वामी, आपने पाराये, एक मुक्त फैसल अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख प्रस्थापित केली.
या व्यतिरिक्त त्यांनी रत्नदीप, सफेद झूठ, मनपसंद, हमारी सून अलका, कमला की मौत अशा कमी चर्चेत राहिलेल्या चित्रपत्यांचेही दिग्दर्शन केले.