संतोष पुजारे यांच्याकडून यू टय़ुबवर प्रदर्शित गाण्याला प्रतिसाद
कणकवली:
गणेशोत्सव काळात निर्मिलेल्या ‘विघ्नहर्ता तू’ या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर याच सिंधुदुर्गवासीय कलाकारांनी महाक्रांती सेना चित्रपट समितीचे अध्यक्ष संतोष पुजारे यांच्या नेतृत्वाखाली आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘दिन दिन दिवाळी’ या गाण्याची निर्मिती केली आहे. नवे गाणे युटय़ुबच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीस आले असून त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राजदत्त कदम यांनी लिहिलेल्या या गाण्याला म्युझिक मिर्ची ऍवॉर्ड विजेते, जिल्हय़ातील प्रतिथयश युवा संगीतकार ऍड. मीतेश चिंदरकर यांनी संगीतबद्ध केले असून गौरी बोधनकर (मुंबई) यांनी ते गायिले आहे. गाण्याला योग्य आकार देण्याची जबाबदारी अजित चव्हाण यांनी पार पाडली आहे.
गाण्याचे चित्रकरण साकेडी येथे झाले आहे. यात वेशभूषा आणि रंगभूषा शैलजा मठकर, नेपथ्य हनुमंत तांबट व गौरव चिंदरकर, प्रकाशयोजना सुनील आजगावकर, चित्रीकरण साईनाथ मठकर, संकेत वालावलकर आणि ओंकार गावकर, तर संकलन नीतेश चव्हाण यांनी केले आहे. गाणे संतोष पुजारे यांच्यासह मनीष चिंदरकर, तन्वी तळगावकर, मानसी वायंगणकर, प्रज्ञा वालावलकर, मनाली तळगावकर, शोभा तळगावकर, पवित्रा मातोंडकर, शिवानी जुवेकर यांच्यावर चित्रीत झाले आहे. गाण्याच्या निर्मितीसाठी उमेश वायंगणकर, अक्षया डिचोलकर, रजत हिर्लेकर यांचेही सहकार्य लाभल्याचे पुजारे यांनी सांगितले.