डबक्यात म्हशी घेतात आनंद, साथीच्या रोगाची भिती
प्रतिनिधी /फोंडा
दिपनगर-कुर्टी, फोंडा येथे उघडय़ावर सांडपाणी सोडत असल्यामुळे दुर्गधी पसरली असून डेंग्यू व इतर डांसामुळे होणारे आजार बळावण्याची भिती येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे. फोंडयातील आरोग्य खात्यातर्फे कोणतीच ठोस उपाययोजना याठिकाणी करण्यात येत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. डेग्यू, मलेरिया, टायफोड सारखे साथीचे रोग बळावण्याआधी उपाययोजना करणे अंत्यत आवश्यक आहे.
दिपनगर कुर्टी येथे सन 2020 साली उघडयावर सांडपाणी सोडण्यात येत असलेल्या प्रकारासाठी 77 पैकी 52 घरांना नोटीसी बजावण्यात आली होती. त्यानुसार काही घरांनी घराशेजारी पाणी जिरवण्याची सोय करून परिस्थिती मारून नेली होती. मात्र वर्षाभरानंतर परत एकदा परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. सांडपाणी उघडय़ावर सोडण्य़ाचे प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे दोन ठिकाण निर्माण झालेल्या डबक्याचा लाभ म्हशी आनंद घेत आहेत.
आरोग्य खात्याने दखल घ्यावी
खांडेपार येथील स्थानिक समाजसेवक संदीप पारकर यांच्या म्हणण्यानुसार दिपनगर कुर्टी हे येथे सर्रास उघडयावर सांडपाणी सोडण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी कुर्टी पंचायतीकडे प्रलंबित आहेत. आरोग्य खाते व सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे तात्पुरती कारवाई करण्यात येते. त्यानंतर परिस्थिती जैसे थे सुरू असते. दिपनगर भाग आजही उघडयावर हगणदारीमुक्त झालेला नाही, येथे उघडयावर असे प्रकार होत असल्यामुळे सरकारने फोंडा हगणदारीमुक्त दिलेला नाऱयाचे येथे फज्जा उडालेला आहे. या भागात 50 चौ. मिटर जागेत घरे उभाल्यामुळे पंचायत, शहर आणि नियोजन खातेच्या परवानगीच्या नियम धाब्यावर बसवून त्या जागेन कोणतीही मोकळी जागा न सोडता पुर्ण 50 चौ. मिटर जागेत बांधकाम करण्यात आलेले आले. याकामी स्थानिक पंचायत सदस्यांचाही त्याना पाठिंबा लाभत असल्याचे दिसून येते.