ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जणांनी पुढाकार घेतला आहे. बॉलीवुड अभिनेता सोनू सूदने देखील अनेक जणांना या संकटात मदत केली आहे. सोनू सूदने अनेकांना लॉक डाऊन च्या काळात अनेक रोजगार प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत केली. अनेकांची जेवणाची सोय केली. त्यानंतर आता सोनू सूदने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोनाच्या काळात नोकरी गमावलेल्या इंजिनिअर मुलीवर भाजी विकण्याची वेळ आली. त्या मुलीच्या मदतीसाठी सोनू सूद धावून गेला. याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
संबंधित मुलीचे नाव शारदा असे असून सोनू सूदने या मुलीला नोकरीची ऑफर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शारदाने नोकरी सुटल्यानंतर घर चालवण्यासाठी भाजी विक्री सुरू केली. ही माहिती एका युजरने या संदर्भात सोनू सूदला ट्विट करत माहिती दिली. तसेच या मुलीला मदत करण्याची विनंतीही केली होती.
त्यानंतर सोनू सूदच्या टीमने शारदा ची भेट देऊन तिला नोकरीचे लेटर दिले आहे. याबाबत स्वतः सोनूने ट्विट करत माहिती दिली आहे. तो आपल्या ट्विट मध्ये म्हणाला की, माझ्या ऑफिसमधून काही लोकं शारदाला भेटायला गेले. इंटरव्ह्यू झाला आहे. नोकरीकरता लेटर देखील देण्यात आले आहे.
दरम्यान शारदाने देखील सोनू सूदने केलेल्या मदतीचे आभार मानले आहेत. तसेच त्याच्या प्रमाणे इतरांनीही मदतीसाठी पुढे आले पाहिजे असे म्हटले आहे.