ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 833 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 49,631 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.85 टक्के इतके आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 423 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 56 हजार 493 इतकी झाली आहे. काल आढळलेल्या 423 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 49, बागेश्र्वर 08, चमोली 0, चंपावत 05, देहरादून 150, हरिद्वार 37, नैनिताल 62, पौरी गरवाल 28, पिथोरगड 12, रुद्र प्रयाग 17, तेहरी गरवाल 12, यू एस नगरमधील 22 आणि उत्तर काशीमधील 21 जणांचा समावेश आहे.
काल 11,586 रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर सध्या 05 हजार 682 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 814 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.